DDRC जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची स्थापना

सामाजिक न्याय या अधिकारीता मंत्रालय दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार द्वारा अतिदुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसमावेशक सोयी, सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यांचे शारीरिक मानसिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्वरूपाचे सर्वांगीण पुनर्वसन होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्धेशाने जिल्हास्तरावर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले.

जळगाव येथील DDRC केंद्र हे इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव या आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवाभावी संस्थेच्या वतीने चालविण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी त्याच्या सर्वांगीण विकासासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा अपंग पुनर्वसन हे तत्परतेने व मनोभावे सेवा सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर राहण्यासाठी कटिबद्ध आहेत.

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची ध्येय व धोरणे

  • जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना आवश्यक सेवा, सुविधांची नोंद करणे.
  • शिबिरांचे व मेळाव्याचे आयोजन करणेदिव्यांग व्यक्ती व पालक यांचे समुपदेशन करणे त्यांना मार्गदर्शन करणे.
  • दिव्यांग व्यक्तींना लागणारे सहाय्यक साहित्य व उपकरणे तज्ज्ञांकडून निर्देशित करून त्यांचे योग्य मोजमाप घेऊन त्यांना साहित्य उपलब्ध करून देणे.
  • कृत्रिम अवयव, उपकरणे यांची दुरुस्ती करून देणे.
  • दिव्यांगत्वानुसार त्यांना आवश्यक चिकित्सात्मक सेवा तज्ञामार्फत उपलब्ध करून देणे.
  • सायकोथेरेपी, फिजीओथेरपी, स्पीचथेरेपी, ओक्युपेशनल थेरेपी व मार्गदर्शन करणे.

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या वतीने उपलब्ध सेवा सुविधा

  • मानसोपचार विभाग
  • फिजियोथेरिपी विभाग
  • वाचा उपचार थेरेपी विभाग
  • कृत्रिम अवयव व उपकरणे निर्मिती विभाग