इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव येथे जागतिक रेडक्रॉस दिना निमित्त दिनांक ८ मे रोजी, रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येऊन पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्त दान करून जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्यात आला.

