चैतन्य नगर जेष्ठ नागरिक संघाचे सभासदांसाठी दिनांक ६, ७ व ८ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता “आनंदमयी गप्पा गोष्टी” हा कार्यक्रम आयोजित केला होता. यात योगा विषयी प्रशिक्षण व आरोग्याबाबत सौ. भाग्यश्री गणेश महाजन यांनी प्रशिक्षण दिले आणि डॉ. सृष्टी प्रथमेश जैन यांनी जेष्ठ नागरिकांना आरोग्याबाबत कोणत्या पाच कृती टाळाव्यात याची थोडक्यात परंतु उपयुक्त माहिती दिली. या कार्यक्रमाची सांगता रेडक्रॉस भवनात रेड क्रॉस अध्यक्ष मा. रोहन घुगे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


