जागतिक रेडक्रॉस दिन ८ मे २०२६

रेडक्रॉस जळगाव येथे जागतिक रेडक्रॉस दिन साजरा

जळगाव – इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव येथे आज दिनांक ८ मे रोजी “मानवतेत एकजूट” या २०२६ च्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या संकल्पनेला अनुसरून जागतिक रेडक्रॉस दिन विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा करण्यात आला. प्रथमत: मा. जिल्हाधिकारी तथा रेड क्रॉस जळगावचे अध्यक्ष रोहन घुगे यांनी जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पाचोरा तालुक्यातील आपत्ग्रस्थांना आर्थिक व साहित्यरूपी मदत कार्य पाठवितांना ज्यांनी सढळ हाताने मदत केली अशा तीस देणगी दात्यांपैकी फक्त बोटावर मोजण्या इतके देणगी दाते सन्मान स्वीकारायला आले याचा अर्थ “उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळता कामा नये” या उक्तीची प्रचिती दात्यांनी दान देऊनही ते आजच्या सन्मान सोहळ्याला दात्यांच्या उपस्थितीवरून जाणवते असे त्यांनी प्रतिपादन केले व अशाच स्वरूपाची मदत भविष्यातहि प्रसंगानुरूप देणगी दात्यांनी करावी असे आवाहन केले. तसेच, रेडक्रॉस रक्तकेंद्रात येऊन रक्तदात्यांनी स्व:इच्छेने रक्तदानासाठी यावे व ज्यांना रक्तदान करणे शक्य नसेल त्यांनी इतरांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही त्यानी या प्रसंगी केले.  कार्यक्रमाची सुरुवात रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील यांनी श्री. घुगे सरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्याने केली. तसेच, त्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून रेड क्रॉसचे संस्थापक सर हेन्री ड्युनन्ट यांच्या प्रतिमेस माल्यार्पण, रेडक्रॉस ध्वजाला वंदना आणि रेडक्रॉस गीताचे गायन करण्यात आले.