राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त रेडक्रॉसमार्फत सिद्धार्थ कार्बोकेम येथे सी.पी.आर.(कृत्रिम श्वासोच्छवास) प्रशिक्षण शिबिर

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावमार्फत दिनांक ५ मार्च २०२६ रोजी औद्योगिक वसाहती मधील सिद्धार्थ कार्बोकेम कंपनीमधील एकूण ६२ कर्मचाऱ्यांना सी.पी.आर. (कृत्रिम श्वासोच्छवास) चे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी दुर्घटना परिस्थितीत हाताळत अपघातग्रस्त व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छवास देऊन हॉस्पिटल पर्यंत पोहोचवताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रथमोपचार प्रशिक्षक सौ. उज्वला वर्मा यांनी प्रशिक्षण दिले. या प्रसंगी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.