रेडक्रॉसच्या सेवाकार्याला दातृत्वाची जोड जैन परिवाराकडून रेडक्रॉसला ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या सेवाकार्यात अनेक दातृत्वाचे हाथ पुढाकार घेत असतात, ज्यामुळे सुरळीत रुग्णसेवा करणे शक्य सहज होत असते. असाच एक सुवर्णयोग जुळून आला. भुसावळ येथील वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले स्व. डॉ. राजेंद्रकुमार कनकमल जैन यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या पत्नी श्रीमती रजनी जैन, मुलगा श्री. सौरभ जैन, सुनबाई सौ. राखी जैन व परिवार यांच्या आर्थिक योगदानातून रेडक्रॉस संस्थेला ॲम्ब्युलन्स सुपूर्त करण्यात आली.  रुग्णांना अत्यल्प दरात सुरळीत ॲम्ब्युलन्स सेवा मिळावी या उद्देश्याने ही ॲम्ब्युलन्स रेडक्रॉसला देत असल्याचे मनोगत जैन परिवाराने व्यक्त केले. त्यांच्या या दातृत्वासाठी रेडक्रॉसच्या वतीने त्यांचा ही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी रेडक्रॉस चेअरमन डॉ.मंगला ठोंबरे, सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य श्री. नीलकंठ गायकवाड  डॉ. उषा शर्मा, श्री. राजेश यावलकर, ॲन्युअल असोसिएट प्रो. श्रीकृष्ण सोमवंशी, श्री. दत्ताराव राठोड रेडक्रॉस अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.