इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी या उद्देश्याने शहरात मोठे होर्डिंग असावे अशी संकल्पना समोर आली. या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रेखा गॅस एजन्सीने पुढाकार घेतला आणि त्यांच्या आर्थिक योगदानातून रेडक्रॉस रक्तकेंद्राच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असलेले मोठे होर्डिंग शहरातील वर्दळीच्या चित्रा चौकात लावण्यात आले. “रेडक्रॉससोबत मागील २५-३० वर्षांपासून जोडले गेलो असून भविष्यातही संस्थेच्या सेवेत आवश्यकतेनुसार सहकार्य करत राहणार”, अशी भावना रेखा गॅस एजन्सीचे संचालक आणि रेडक्रॉसचे पेट्रोन सभासद मा.श्री. दिलीपजी चौबे यांनी व्यक्त केली.या प्रसंगी रेडक्रॉस चेअरमन डॉ.मंगला ठोंबरे, सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य श्री. नीलकंठ गायकवाड डॉ. उषा शर्मा, श्री. राजेश यावलकर, ॲन्युअल असोसिएट प्रो. श्रीकृष्ण सोमवंशी, श्री. दत्ताराव राठोड रेडक्रॉस अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
