मा. श्री. आयुष प्रसाद यांच्या हाकेला आवाहनास जळगाव करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…आपतग्रस्थांसाठी मदत साहित्य रेडक्रॉस, जळगाव येथून अमृतसरकडे रवाना

“एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ” या उदात्त हेतूने अमृतसर येथील आपतग्रस्तांसाठी जळगावकर नागरिक पुढे सरसावले आणि शेकडो मदतीच्या हाताने आपतग्रस्तांचे विस्कळीत जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी रेडक्रॉस आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने विविध जीवनावश्यक वस्तू असलेले एक ट्रक साहित्य अमृतसर येथे पाठविण्यात आले.
माननीय जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे अध्यक्ष मा.श्री.आयुष प्रसाद यांच्या आवाहनानुसार रेडक्रॉसच्या आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गत रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत रेडक्रॉसकडे उपलब्ध असलेले ताडपत्री, चटई, ब्लॅंकेट गरम कपडे, साड्या, भांड्यांचे सेट, मच्छरदाणी, प्लास्टिक बादल्या चिक्की, राजगिरा लाडू इत्यादी साहित्य व जळगाव जिल्ह्यातील अनेक दानशूरांनी दिलेले दैनंदिन उपजीविकेसाठी आवश्यक किराणा सामान, डाळी, मूग मटकी, सोलापुरी चादरी, पाण्याचे मग,, फूड पॅकेट्स, लोणचे, मीठ, शेंगदाणे खाकरा, गोडेतेल, फास्ट फूड पॅकेट्स, हल्दीराम नमकीन, गुळ, खोबरेल तेल, कंगवे, आंघोळीचे साबण, कपड्याचा साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, सोलर सिस्टीमने चालणारे टॉर्च, मेणबत्ती, लेडीज- जेन्ट्स चप्पल इत्यादी आर्थिक व साहित्यरुपी मदतीचा हात पुढे केला. महाराष्ट्राच्या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे, जळगावच्या खासदार मा. स्मिताताई वाघ यांनी प्रत्यक्ष रेडक्रॉस भवन येथे येऊन सर्व साहित्याची पाहणीकरत रेडक्रॉसच्या पुढाकाराचे कौतुक केले. माननीय जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे अध्यक्ष मा. श्री. आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत सदर साहित्य हे तेथील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून अमृतसर येथे रवाना करण्यात आले.
तहसीलदार डॉक्टर उमा ढेकळे, उपाध्यक्ष गनी मेमन, भालचंद्र पाटील, चेअरमन डॉ.मंगला ठोंबरे, सेक्रेटरी सुभाष सांखला, रेडक्रॉस रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, व्हाईस चेअरमन राजकुमार वाणी, कार्यकारिणी सदस्य हर्षदभाई दोशी इत्यादी पदाधिकारी व आजीवन सभासद राजेश राठी, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, सहप्रशासकीय अधिकारी राजेश सुरळकर, श्री. सुनील वर्मा, श्री. विशाल वाणी, सुनील श्रीश्रीमाळ, रेडक्रॉसचे कर्मचारी संजय साळुंखे, महेश सोनगिरे, सौ.उज्वला वर्मा, सौ.अनुशी कुकरेजा, मनोज वाणी, योगेश सपकाळे, समाधान वाघ, शीतल शिंपी, बापू सोनवणे उपस्थित होते.

देणगीदाते – वेगा केमिकल्स, आर.सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट, जैन इरीगेशन, व्यंकटेश रिफायनरी बालाजी एरंडोल, नवजीवन प्लस, श्रद्धा पालीमर्स, अण्णासाहेब सागरमल सांखला अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी, सुहास लढ्ढा, श्यामसुंदर बिर्ला, संघवी अनब्रेकेबल, ओमप्रकाश राठी, सुनील सुखवानी, विनोद बियाणी, दि जळगाव पीपल्स बँक, निलान्स इंटरप्रायजेस उतराण, श्री. अशोक धूत, महावीर ओईल मिल दोंडाईचा, पिंच सोडावाला, सुनील वर्मा, पराग जैन, एस.के. ऑइल मिल, भंडारी मेडीकल्स, श्री. प्रतिक केजरीवाल, ममता केजरीवाल, निलेश अग्रवाल कासोदा, रोहन बाहेती, रविंद्र बावणे, ज्ञात, अज्ञात देणगीदाते.