“जेनेरिक मेडिसीन” हा भारत सरकार पुरस्कृत उपक्रम असून उत्तम दर्जाची औषधी जनतेला स्वस्त दरात उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प रेडक्रॉस मार्फत राबविण्यास मागील ९ वर्षांपासून सुरूवात केली गेली आहे. या प्रकल्पा अंतर्गत फुलफगर फार्मा, विसनजी नगर; केदारनाथ मेडिकल स्टोअर्स, रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटल रोड; आयुष मेडिकल स्टोअर्स, गुरुदत्त नगर; गितेश मेडिकल स्टोअर्स, ओमशांती नगर, पिंप्राळा या ठिकाणी सर्व सामान्य जनतेला नामवंत कंपन्यांची जेनेरिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात आहे. या सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये जेनेरिक औषधीवर किमंतीच्या ६० ते ७० टक्के सवलत, स्टॅंडर्ड मेडिसिनवर ५ ते १० टक्के सवलत व आयुर्वेदिक औषधीही सवलतीत दिली जाते. या जेनेरिक मेडिकल दुकानांचा अनेक सर्वसामान्य नागरिक लाभ घेत आहेत. उत्तम दर्जाची औषधी सवलतीच्या दरात मिळत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करतात.
