इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेमार्फत रेडक्रॉस ऑर्थोपेडीक लायब्ररी सुरु करण्यात आली आहे. TEAM ONE CONSULTANT यांच्याकडून देणगी स्वरुपात ऑर्थोपेडीक साहित्य जळगाव शाखेला प्राप्त झाले असून या लायब्ररी मधून रुग्णांसाठी लागणारे मोठे बेड, लहान बेड, व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर, आधार काठी (stick) इत्यादी साहित्य फक्त डिपॉझीट रक्कम जमा करून वापरासाठी दिले जाते. साहित्य घेतल्यापासून एक महिना त्या साहित्यासाठी कोणतेही भाडे आकारले जात नाही. एक महिन्यानंतर रेडक्रॉस शाखेला सूचित करून पुन्हा पुढील काही दिवस साहित्य वापरता येते. परंतु अशी सूचना न दिल्यास दर दिवसाला नाममात्र भाडे आकारले जाते. साहित्य परत आणून दिल्यावर तांत्रिकदृष्ट्या त्याची तपासणी करून रुग्णांना डीपॉझीटची रक्कम परत केली जाते. आत्तापर्यंत अनेक गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे व घेत आहेत.
