रेडक्रॉसच्या माध्यमातून रेडक्रॉस भवन येथे फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या आजारांवरील उपचार करण्यासाठी फिजिओथेरपीची (भौतिकोपचाराची) आवश्यकता असते. यामध्ये पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, न्यूरो फिजिओथेरपी, अर्धांगवायू, मुलांसाठी फिजिओथेरपी यांचा समावेश आहे. ही सेवा अत्यल्प दरात सुरु असून अपंग व्यक्तींना मोफत फिजिओथेरपी सेवा दिली जाते. अनेक नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत.
