कॅनडियन रेडक्रॉसच्या माध्यमातून आणि इंडिअन रेडक्रॉस सोसायटी राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली व राज्य शाखा मुंबई यांच्या सहकार्याने रेडक्रॉस जळगाव शाखेला अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी मेडिकल व्हॅन मिळालेली असून या व्हॅनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात विविध ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्य तपासणी शिबिरे घेणे सहज शक्य होत आहे. यात आत्तापर्यंत चोपडा, यावल, पाचोरा भागातील आदिवासी पाड्यांवर, विविध ग्रामीण भागांमध्ये आणि जळगाव शहरातील तांबापुरा, मेहरूण गाव, गेंदालाल मिल, कंजरवाडा, सुप्रीम कॉलनी, जुने जळगाव या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. यात हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह, मोती बिंदू, आवश्यकतेनुसार इ.सी.जी. या तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारच्या आरोग्य तपासण्या विविध ठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये करण्यात येत असतात.
