रेडक्रॉस जळगाव मार्फत शासकीय व निमशासकीय कार्यालये, खाजगी कंपन्या व कारखाने इत्यादि ठिकाणी काम करीत असलेल्या कामगारांना मान्यताप्राप्त प्रथमोपचार प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित केले जातात व कामगारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते आणि त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येते. विविध कंपन्यांमधील कर्मचारी व विविध समाजसेवी संस्थांच्या प्रतींनिधींनी प्रथमोपचार प्रशिक्षण घेतलेले आहे.
