रेडक्रॉस भवन येथे ई सेतू सुविधा केंद्र व आधार सुविधा केंद्र शासकीय सेवाशुल्कात सुरू करण्यात आले असून उत्पन्न दाखला , आधार कार्ड (नवीन दुरुस्ती),७/१२ उतारा , ह्यातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र), उद्योग आधार, पॅन कार्ड , वय , अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला , ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट , नॉन क्रिमिलिअर ,परीक्षा /नोकरी , जेष्ठ नागरिकत्व ,परीक्षा /नोकरी,ऑनलाईन फॉर्म, जी.एस.टी. रिटर्न, चरित्र पडताडणी(पोलीस व्हेरिफिकेशन,इन्शुरन्स, महिला ३३%आरक्षण प्रमाणपत्र, वीजबिल भरणा सर्व प्रकारचे प्रतिज्ञा पत्र , एस.ई. सी. प्रमाणपत्र, नवीन रेशन कार्ड इत्यादी सेवा उपलब्ध कराण्यात आलेली आहे व त्यासाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आले असून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी रेडक्रॉस भवन सिव्हील हॉस्पिटल शेजारी ,न्यू बी.जे.मार्केट जवळ जळगाव येथे सुरू आहे.
दिव्यांग बांधवांना अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी,(UDID)सक्तीची करण्यात आलेली आहे. या नोंदणी मुळे दिव्यांग बांधवांना शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ घेणे शक्य होईल. म्हणून दिव्यांग बांधवांसाठी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी,(UDID), बस सवलत पाससाठी नोंदणी या सुविधा अल्पदरात रेडक्रॉस भवन येथे उपलब्ध केल्या आहेत. बहूसंख्य दिव्यांग बांधव या सुविधेचा लाभ घेत आहेत.
