रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC)

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग अंतर्गतचे दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्यान्वीत जिल्हास्तरावरील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीने, माहे जानेवारी २०१८ पासून मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष रेडक्रॉस शाखा जळगाव, जिल्हा व्यवस्थापन समिती व इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या मान्यतेने चालविण्यासाठी घेतले आहे. सदरच्या केंद्रामार्फत जिल्ह्यातील दिव्यांगांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसनाचे कार्य चालते. त्या अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन देणे, त्यांना स्पिचथेरपी, फिजीओथेरपी, समुपदेशन इत्यादी सेवा देणे तसेच दिव्यांगांच्या  पालकांचे समुपदेशन करणे, त्यांना सल्ला व मार्गदर्शन करणे, मेळावे व शिबिरे आयोजित करुन त्यांना आवश्यकतेनुसार शासनाच्या मदतीने आणि संस्थेच्या मदतीने सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे अश्याप्रकारचे कार्य करण्यात येत आहे.