रेडक्रॉस ऑक्सिजन बँक

रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली यांच्या सहकार्याने रेडक्रॉस जळगाव शाखेमार्फत रेडक्रॉस ऑक्सिजन बँक सुरु करण्यात आली असून विनामूल्य ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जातात. विविध आजारांचे उपचार घेत असताना काही आजारांमध्ये रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते. फक्त ऑक्सिजन मशीनसाठी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये राहावे लागते व त्यांचा अनावश्यक खर्च वाढतो. या सर्व बाबींचा विचार करून रेडक्रॉस ऑक्सिजन बँक सुरु करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना रुग्णालयातून डीस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांच्या परवानगीनुसार घरी ऑक्सिजनची आवश्यकता असते अशा रुग्णांसाठी विनामूल्य ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यात येतात. यासाठी फक्त डीपॉझीट रक्कम जमा केली जाते. रुग्ण, १५ दिवसानंतर रेडक्रॉस  जळगाव शाखेला सूचित करून पुन्हा पुढील दिवस ऑक्सिजन कॉन्संट्रेटर वापरू शकतात. परंतु अशी सूचना न दिल्यास ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीनसाठी दर दिवसासाठी नाममात्र भाडे आकारले जाते. आजपर्यंत अनेक   रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.