रेडक्रॉसमार्फत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे एक दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावमार्फत दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी औद्योगिक वसाहती मधील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मथील एकूण २१ कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी सर्वांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षक डॉ. राजेश सुरळकर, डॉ.नितीन धांडे आणि सौ. उज्वला वर्मा यांनी प्रशिक्षण दिले. शिबिराच्या समारोपप्रसंगी रेडक्रॉसच्या चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे, रेडक्रॉसचे सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, रक्तकेंद्राचे व्हाईस चेअरमन श्री. राजकुमार वाणी, कंपनी हेड श्री.गौतम दामोर यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.