रेडक्रॉसने आपत्तीग्रस्त परिवारांना दिला मदतीचा हाथ

“एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ” या उक्तीची प्रचिती आज जळगावकरांना आली.
आज सकाळी १०.३० च्या सुमारास जळगाव शहरातील तरुण कुढापा चौक, जुने जळगाव येथे शॉर्टसर्किट मुळे तीन घरे जळून खाक झाली. सुदैवाने अध्यात्मिक कारणामुळे बाहेर असल्याने जीवितहानी झाली नाही.
रेडक्रॉसचे सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला यांना ही माहिती मिळताच त्यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थिती जाणून घेत मदती ची तयारी दर्शविली. रेडक्रॉसच्या आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गत त्वरित ब्लँकेटस, चटई, भांड्याचा सेट, साडय़ा, कपडे, ताडपत्री, बादल्या इत्यादी दैनंदिन संसार उपयोगी साहित्य त्वरित देऊन त्यांना आधार दिला. जळगाव शहराचे आमदार श्री. राजूमामा भोळे, नगरसेवक श्री. पियुष कोल्हे यांनी रेडक्रॉसने तत्परतेने दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी रेडक्रॉसच्या चेयरमन डॉ. मंगला ठोंम्बरे, रेडक्रॉसचे सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, जनसम्पर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा, सहाय्यक श्री. योगेश सपकाळे, सौ. शितल शिंपी, परिसरातील रहिवासी असलेले रेडक्रॉसचे आजीवन सभासद श्री. प्रशांत सूरळकर, श्री. शैलेश सूरळकर, श्री. राजेंद्र पाटील, श्री. सुनील वर्मा व नागरिक उपस्थित होते.
घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने त्यांना लवकरच आवश्यक किराणा साहित्य ही देण्यात येईल अशी माहिती रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांनी दिली.