मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष इंडियन रेडक्रॉस सोसायटी श्री.रोहन घुगे साहेब यांचे सूचनेवरून जळगाव जिल्हातील भोलाणे या गावी येथील आग पीडित दोन कुंटुबीयांना इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव व दानदात्यांच्या सहकार्याने भरीव मदत- एक महिन्याचा संपूर्ण किराणा , त्यात साबण, तेल, तुप , साखर, गुळ, मसाले, डाळी, तांदुळ, पिठ , चहा पावडर व इतर किराणा, ५० किलो गव्हाचा कट्टा, ४ भांडी सेट, चटया, बादल्या, ताडपत्र्या , ब्लॅंकेट्स, कपडे असे साहित्य वाटप करतांना चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे, रक्तकेंद्र व्हा. चेअरमन श्री. राजकुमार वाणी , सचिव श्री. सुभाष सांखला, भोलाणे गावचे सरपंच श्री. नितीनभाऊ कोळी ,योगेश सपकाळे व आग पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थ हजर होते.


