पर्यावरण सुरक्षेबाबत विद्यार्थ्याना विद्यार्थ्याना शालेय जीवनापासूनच सवय लागावी या उद्देशाने सागर मित्र, सामनेर या संस्थेचे श्री. विशाल सोनकुळ, यांच्या सहकार्याने जळगाव शहरातील विविध शाळेतून प्लास्टिक केर कचरा जमा करून त्याची योग्यरित्या विल्हेवाट करण्याचबाबतचे कार्य गेल्या दोन वर्षांपासून पासून सुरू आहे. जळगाव शहर आणि जवळपासच्या तालुक्यातील अनेक शाळा आणि हजारों विद्यार्थी या उपक्रमात जोडले गेलेले असून नियमित स्वरुपात प्लॅस्टिक कचरा संकलन केले जाते. आजपर्यंत जवळजवळ १० टन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन या केंद्रमार्फत करण्यात आले आहे.
