जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पाचोरा शहर, शिंदाड, सातगाव डोंगरी, वेरुळी, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा, नगरदेवळा आणि सोयगाव तालुक्यातील बनोटी या गावांमध्ये अतीवृष्टी व ढगफुटीमुळे जवळजवळ ५०० घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती मिळाल्यावर लगेचच मा.जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष मा.श्री.आयुष प्रसाद यांच्या आवाहनानुसार रेडक्रॉसच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत विस्थापित झालेल्या परिवारांना आवश्यक खाद्य पदार्थ व साहित्याची जमवाजमव करण्याकामी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या चेअरमन डॉ. मंगलाताई ठोंबरे उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, गनी मेमन, राजकुमार वाणी, सुभाष सांखला इत्यादीनी तयारी करण्यास सुरुवात केली, यात अत्यल्प वेळात सकाळपर्यंत दानशुर व्यक्ती व संस्थाच्या सहकार्याने तसेच रेडक्रॉसकडे उपलब्ध असलेल्या ताडपत्र्या, प्लास्टिक मॅटस, ब्लॅंकेट, गरम कपडे, साड्या, भांड्यांचे सेट, प्लास्टिक बादल्या, चिक्की, राजगिरा लाडू, खाकरा, लोणचे मसाले एक महिन्याचा रेशन इत्यादी साहित्य, तसेच दि जळगाव पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँक आणि वेगा केमिकल्स यांच्या दातृत्वातून महिन्याभराचा किराणा सामान असलेले ५०० किट्स व जळगाव जिल्ह्यातील अनेक दानशूरांनी दिलेले दैनंदिन उपजीविकेसाठीचा आवश्यक किराणा सामान, डाळी, सोलापुरी चादरी, लहान मुलांचे कपडे, मोठ्यांसाठी टी-शर्ट, पारले-जी बिस्किट्सचे खोके, गरम मसाला, शुध्द पेयजलाचे पाणी बॉटल बॉक्स, गोडेतेल, गुळ, आंघोळीचे साबण, कपड्याचा साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, इत्यादी साहित्य पाठविण्यात आले.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री मा. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी रेडक्रॉससारख्या संस्थांमुळे माणुसकीची भावना जोपासली जात असून आपत्तीग्रस्तांना सर्वात आधी मदत साहित्य पोहोचवत जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांबद्दलचे कर्तव्य पार पाडले आहे अशा शब्दांत रेडक्रॉसच्या सेवेचे कौतुक केले. यावेळी पाचोऱ्याचे आमदार मा. श्री. किशोर पाटील, पाचोरा तालुक्याचे प्रांताधिकारी श्री. भूषण अहिरे साहेब, तहसीलदार श्री. विजय बनसोडे साहेब, नायब तहसीलदार व त्यांचे सहकारी यांच्या समवेत सेक्रेटरी सुभाष सांखला, रक्तकेंद्र व्हाईस चेअरमन राजकुमार वाणी, ॲन्यूअल असोशिएट सिद्धांत शिसोदिया, तसेच निरंकारी मंडळाचे श्री. महेश वाघ आणि स्थानिक निरंकारी स्वयंसेवकांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष आपतग्रस्तांना साहित्य वितरीत केले. जीवनावश्यक सामग्री पाठविण्याच्या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
देणगीदाते-
दि जळगाव पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँक, जळगाव आणि वेगा केमिकल्स प्रा.लि, जळगाव, स्व. अण्णासाहेब सांखला अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी, जळगाव, श्रीमती मालती ठोंबरे, श्री. विजय बापू पाटील, डॉ. अपर्णा मकासरे, श्री. राजकुमार वाणी, श्री. अभिषेक सुनील बाफना, श्री. कस्तूरचंदजी बाफना, श्री. स्वरूप लुंकड, सौ.मंजू सुभाष सांखला, श्री. छगनलाल शिसोदिया पाचोरा, श्री. अभयकुमार चोरडिया, श्री. महेंद्रजी रायसोनी, अर्पित अँग्रो, जळगाव, संचेती ग्लोबल फुड्स, श्री. प्रशांत छाजेड, श्री. सुहास लढ्ढा, श्री. राहुल निकम, श्री. योगेश खाबिया, आर.एल. हॉस्पिटल, श्री. एम. जी. पाटील, श्री. श्रीकांत वाणी, श्री. विक्रम मुनोत, सर्वोदय दाल मिल, श्री. संदीप भोळे, सौ. उज्वला टाटीया, श्री. मह्पाल बोरा, श्री. प्रतिक केजरीवाल, श्री. संजय राजहंस





