संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक-अनैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये अनेक परिवार उध्वस्त होतात.अशी परिस्थिती हाताळण्याबाबत रेडक्रॉसमार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाते.या अंतर्गत आपत्ती येण्याअगोदर,आपत्ती आल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत आपदग्रस्तांचे जीवन वाचवणे,त्या भागातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी कार्य करणे या सर्व बाबींचे प्रशिक्षण रेड क्रॉस च्या स्वयंसेवकांना प्रात्यक्षिकांसह दिले जाते.रेडक्रॉस मार्फत आपदाग्रस्त परिवारांना व त्या परिवारातील सदस्यांना आवश्यकतेनुसार धान्य,चटई,भांड्यांचा सेट,साड्या,तयार कपडे,टी-शर्ट,बेडशीट,टॉवेल्स, लहान मुलांचे कपडे,स्वेटर, कंबळ इत्यादी वस्तूंचे वितरण करून त्यांना मदत करण्यात येते तसेच, आपत्तीग्रस्त जखमींना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला पाठविले जाते.
